loader
Breaking News
Breaking News
Foto

देवबागच्या समुद्रात बुडणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाला वाचविणाऱ्या मच्छिमाराचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) - देवबाग सिद्धेश्वर मंदिरासमोरील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडणाऱ्या दर्श दत्तात्रय चोपडेकर या नऊ वर्षीय मुलाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविणाऱ्या रावजी उर्फ काका अवधूत चोपडेकर (वय ५८, रा. देवबाग चोपडेकरवाडी) यांचा श्वसननलिकेत समुद्राचे पाणी गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मालवण पोलिसांनी आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून चोपडेकर यांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे देवबाग गावावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संबधीचे अधिक वृत्त असे की देवबाग चोपडेकरवाडी येथील दर्श दत्तात्रय चोपडेकर हा आपल्या मित्रमंडळी समवेत देवबाग येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील समुद्रात स्नानासाठी उतरला होता. त्यावेळी समुद्राच्या पाण्याला भरती असल्याने पाण्याच्या तीव्र करंटमध्ये दर्श चोपडेकर हा समुद्रात ओढला जाऊ लागला. हा प्रकार मित्रमंडळींच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. ही घटना समुद्रकिनारी मासेमारीसाठी उभ्या असलेल्या रावजी चोपडेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी समुद्रात धाव घेतली आणि बुडणाऱ्या दर्श याला वाचविले.

टाइम्स स्पेशल

याचवेळी दोन जीवांची वाचण्यासाठी चाललेली धडपड लक्षात घेऊन समुद्रात असणाऱ्या एका नौकेने त्याठिकाणी धाव घेत दर्श याला आपल्या नौकेत घेतले व रावजी चोपडेकर यांना वाचविण्यासाठी हात पुढे करून त्यांना नौकेत घेतले. मात्र, बराच वेळ समुद्रात राहिल्याने समुद्राचे पाणी रावजी यांच्या श्वसननलिकेतून फुफ्फुसापर्यंत पोहचल्याने रावजी चोपडेकर अत्यवस्थ बनले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे देवबाग गावावर शोककळा पसरली आहे. रावजी चोपडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर देवबाग ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg