loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटात सापडलेली बॅग प्रामाणिकपणे परत करणारे पत्रकार संतोष पोटफोडे यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

देवळे (प्रकाश चाळके) - आंबा घाट परिसरात दुचाकीस्वराची हरवलेली बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देत पत्रकार संतोष पोटफोडे यांनी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरात कौतुकाची भावना व्यक्त होत असून प्रामाणिकपणा अजूनही समाजात जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबा घाटातून प्रवास करत असताना एका दुचाकीस्वाराची बॅग रस्त्यालगत पडलेली असल्याचे संतोष पोटफोडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बॅग उघडून पाहणी केलीअसता त्यामध्ये सुमारे रु. 6 हजार 100 रुपयांची रोख रक्कम, मोबाईलफोन, चार्जर, कपडे, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. कोणताही विलंब न लावता त्यांनी ही बँक साखरपा पोलिसांच्या ताब्यात सुपूर्त केली.

टाइम्स स्पेशल

पोलिसांनी ही तत्परता दाखवत बागेतील कागदपत्रांच्या आधारे संबंधित दुचाकी स्वराचा शोध घेत त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व साहित्य संबंधित व्यक्तीकडे सुखरूप परत करण्यात आले. अचानक ठरवलेले साहित्य पुन्हा मिळाल्याने दुचाकीस्वाराने समाधान व्यक्त करत पत्रकार संतोष पोटफोडे आणि पोलिसांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg