खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाकानजीक आराम बसला मोटारीची पाठीमागून धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरविण्यासाठी थांबली असताना मुंबईहून संगमेश्वरकडे जाणार्या स्विफ्ट मोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात मोटारीतील पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (५०), जनार्दन खेराडे (४०), परशुराम गुणाजी खेराडे (६०, सर्व रा. संगमेश्वर) आणि अर्जुन धोंडीबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे पाजजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्तांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर परशुराम खेराडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह भरणे येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक यांच्या मदतीने खेड पोलिसांनी सर्व अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले.
या अपघातामुळे महामार्गावर तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. हा अपघात इतका भिषण होता की, अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटारीतील सिलेंडरचा टँक गाडीच्या पुढील सीटवर आला होता. भरणे नाका ब्रिज खाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व प्रसिद्धी रुग्णवाहिका १०८ अपघातग्रस्त जखमीनां घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.