भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फंत सन 2024-25 या वर्षांसाठी देण्यात येणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार या गटात वासांबे ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. या पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्याचा लौकीक राष्ट्रीय स्तरावर पुन्हा अधोरेखित झाला आहे. ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा स्वतः चे महसूलाचे स्त्रोत वाढवित आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत वासांबेचे सरपंच उमाताई संदिप मुंढे, उपसरपंच दिपक कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ आदींचे अभिनंदन होत आहे. देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या स्पर्धेत वासांबे ग्रामपंचायतीने बाजी मारत रायगड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक यश मिळवले आहे. हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीचा सन्मान नसून गावपातळीवरील पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल मानली जात आहे.
वासांबे विकासासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या गाव विविध योजनांमध्ये ग्रामस्थांचा थेट सहभाग, पर्यावरणपूरक उपक्रम, मूलभूत सुविधांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली. गावाच्या विकासात लोकसहभाग आणि जबाबदारी यांना प्राधान्य देत वासांबे ग्रामपंचायतीने आत्मनिर्भर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. आज राज्यातील अनेक ग्रामपंचायती अजूनही रस्ते, पाणी, गटारे, कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या समस्यांमध्ये अडकलेल्या वासांबे ग्रामपंचायतीने इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कामाच्या बळावर गाव बदलू शकते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता वासांबे ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतींसमोर उभा राहिला असून गावपातळीवरील विकासाच्या कामांबाबत नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार गटात देशात प्रथम क्रमांक पटकावत वासांबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्राची शान अधिक उंचावली आहे.
गावाचा विकास म्हणजे जनतेचा विकास हे कृतीतून सिद्ध करणाऱ्या वासांबे ग्रामपंचायतीच्या यशामुळे आता इतर ग्रामपंचायतींवरही दर्जेदार आणि पारदर्शक काम करण्याचा दबाव वाढणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. फक्त फलकांवर विकास नको प्रत्यक्षात काम करा ! असा ठोस संदेश या पुरस्कारातून संपूर्ण राज्याला मिळाल्याचे बोलले जात आहे. या यशामागे अपर आयुक्त माणिक नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुपाली शंकर सातपुते, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, विस्तार अधिकारी पंचायत शैलेंद्र तांडेल तसेच विस्तार अधिकारी पंचायत विनोद चांदोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा यांचा राष्ट्रीय स्तरावर रायगड जिल्ह्याचे नावलौकिक केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.