loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत मंडळ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - महसूल व वनविभागाच्या निर्देशानुसार "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर" अभियानाच्या टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अर्चना बोंबे यांच्या नेतृत्वाखाली बुरोंडी, आगरवायंगणी, वेळवी, हर्णे आणि दापोली या मंडळ स्तरावर शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा या"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर" अभियानाच्या टप्पा क्र.१ अभियानामध्ये नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण, प्रलंबित प्रकरणांचा आढावा व जलद कार्यवाही, विविध दाखल्यांशी संबंधित अडचणी दूर करणे, प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे, 7/12 उतारा, 8 अ उतारा, राजपत्राने नाव दुरुस्ती आदेश, लक्ष्मी मुक्ती योजना, ई-फेरफार, इतर महसुली तक्रारींचे निवारण, विविध शालेय दाखल्यांचे वितरण, आयुष्यमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करणे, आरोग्यविषयक विविध योजनांबाबत सेवा, ऍग्रीस्टॅक, पीएम किसान लाभार्थी नाव नोंदणी, पात्र लाभार्थी यांची ई-केवायसी, GNSS विषयी तांत्रिक माहितीचे सादरीकरण, ई-रेकॉर्डस, भू-नकाशा प्रदर्शन, पाणंद रस्ते मोजणी अभियानाबाबत माहिती, मतदान नोंदणी करिता नमुना 6,7,8 अर्ज स्वीकारणे, नवीन रेशनकार्ड, डिजिटल रेशनकार्ड, रेशनकार्ड मध्ये नाव चढवणे व कमी बाबत सेवा पुरवणे आदी प्रकारच्या महसुलविषयक व इतर विभागातर्फे विविध सेवा, दाखले यांचे प्रस्ताव तयार करुन लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने जलदरित्या वितरण करण्याचे कामकाज सदर शिबीरांमध्ये करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

असे हे शिबिर बुरोंडी मंडळातील नागरिकांसाठी ८ मे २०२६ रोजी करंजगाव हायस्कूल येथे, आगरवायंगणी मंडळाचे कुणबी भवन आगरवायंगणी येथे ९ मे २०२६ रोजी, वेळवी मंडळाचे वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेळवी येथे ११ मे २०२६ रोजी तर हर्णे मंडळाचे १५ मे २०२६ रोजी एन.डी.गोळे हायस्कूल हर्णे येथे तसेच दापोली मंडळाचे डॉ.बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी वरील क्षेत्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांच्या ठिकाणी महसूल मंडळातील नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून महसुल विषयक विविध सेवा, दाखले प्रमाणपत्र यांचा लाभ घ्यावा व महसुल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दापोली तालुक्यातील सर्व नागरिकांना केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg