loader
Breaking News
Breaking News
Foto

​हडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी) - कणकवली येथील विवेकानंद नेत्रालय आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडी (फेसकॉम संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने हडी शाळा नं. २ (जठारवाडी) येथे 'मोफत नेत्र तपासणी' शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये ४० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील १२ जणांची मोतीबिंदू शस्त्रकीया तर १० जणांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे. दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोहर हडकर नेत्रालयाचे संदीप कदम, हडी ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष आरती कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, गोविंद मुणगेकर, गुरुनाथ गावकर, नंदकुमार पाटील, प्रभाकर कांदळकर, चव्हाण आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वयोमानानुसार आपल्या शरीराच्या इतर तक्रारींसोबतच डोळ्यांचे विकारही वाढू लागतात. अनेकदा 'म्हातारपणामुळे दिसत नाहीये' असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आजच्या प्रगत वैद्यकीय युगात मोतीबिंदू किंवा दृष्टीदोष यांवर मात करणे सहज शक्य आहे, असे यावेळी मनोहर हडकर म्हणाले. ज्येष्ठ नागरिक संघाचा मुख्य उद्देश फक्त एकत्र येऊन गप्पा मारणे हा नसून, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजासाठी काहीतरी विधायक करणे हा आहे. आजचे हे शिबिर त्याच भावनेतून आयोजित केले आहे, असे संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे म्हणाले. उपाध्यक्ष आरती कदम यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg