सावंतवाडी : घराशेजारी बेजबाबदारपणे इमारत बांधकाम करत माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर होणारा अन्याय व वाट धोकादायक झाल्याने होणारे अकारण हाल दुर करण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांसह न.प.तील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणीही दखल घेत नाहीत. आमच्या पायऱ्या खचल्या असून पावसाळ्यात त्या पडल्या तर करायचं काय ? असा सवाल माजी प्राचार्य गिरीधर परांजपे व विजय परांजपे यांनी केला आहे. परांजपे म्हणाले, माझं वय ७९ असून भाऊ अन् वहिनी दोघेही ज्येष्ठ नागरिक आहे. सबनीसवाडा भागात मी माझ्या कुटुंबियांसमवेत राहत असून माझ्या शेजारील जागेत सुमारे १० ते १५ फुट अंतरावर परप्रांतीय ठेकेदाराकडून १ वर्षापासून बांधकाम करण्यास सुरुवात केलेली आहे. जमीन खणण्याच्याबाबतीत चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे रोजच्या वापरातील आमच्या सुमारे १५ ते २० पायऱ्या कोसळल्या असून नगरपरिषदेचा सुमारे ८ ते १० फुटाचा रस्ता देखील कोसळला होता. रस्त्यावरील विद्युत भारीत खांब देखील दिव्यासह कोसळून पडला होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, आज वाटेतील उर्वरीत सर्व पायऱ्यांवर भेगा पडल्या असल्यामुळे केव्हाही त्या कोसळून जीवीतास धोका होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत नगरपरिषद बांधकाम अधिकारी, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना कळवूनही अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. बहुतांश लोकप्रतिनिधी माझे विद्यार्थी आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आमचेच असताना आज ही कैफियत मांडण्याची वेळ माझ्यावर आली याचा खेद वाटतो. माझ्या पारंपारीक वाटेतील पायऱ्या व पूर्ण वाट नीट करुन दिल्याशिवाय पुढील बांधकामास परवानगी देऊ नये अशी माझी प्रमुख मागणी आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला रेलिंग किंवा ग्रील्स बसवून द्यावेत, रस्त्यावर पुर्वीपासून असलेला लाईटचा खांब दिव्यासह पुर्ववत बसवून द्यावा. संरक्षक भिंत बांधताना जमिनीत पाडलेले चर, खंदक बुजवून समपातळीत करुन द्यावेत. बांधकामासाठी पाडून ठेवलेले सुमारे १०"२०' खोलीचे खड्डे बुजवून टाकावेत. मोती तलावाच्या पाण्याच्या पातळीखाली सुमारे २०' खोल खड्डे असल्याने यात सतत पाणी असते. त्यामुळे मी राहत असलेल्या इमारतीस धोका संभवतो. पावसाळ्यात ते अधिकच धोकादायक होणार आहे.
त्यामुळे तात्काळ कार्यवाही करावी, आज डॉक्टरांना भेटणे, बाजाररहाट करणे पण अशक्य झालेले आहे. तर २०-२२ फूट उंचीचे लावून ठेवलेले पत्रे काढुन टाकावेत. वादळी वाऱ्यात ते पडल्यास धोका निर्माण होईल. त्यामुळे मागण्या पूर्ण केल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला ईमारत बांधकाम करण्यास देऊ नये असही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत नगरपरिषद प्रशासनाला विचारलं असता याबाबत नगर रचना विभाग कार्यवाही करत आहे. बांधकाम विभागाकडूनही माहिती घेतली असून संबंधित बिल्डरला सुचना दिल्याचेही बांधकाम अभियंता तुषार सरडे यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, स्थानिक नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी याची दखल घेतली असून आज अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जात प्रत्यक्ष पाहाणी केली. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.