संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली दाभीळ-पांगारी एसटी शनिवार दिनांक 9 व रविवार 10 मे या दिवशी अचानक बंद केल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एसटी बंद करून मनमानी कारभार करणाऱ्या दापोली आगार प्रमुखांबद्दल त्रिव्र नाराजी पसरली आहे. दापोलीतून नियमित दुपारनंतर 3 वाजून 30 मिनिटांनी दापोली वाकवली मार्गे दाभिळ- पांगारी अशी बस सेवा गेले अनेक वर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील लोकांना ही सुविधा अतिशय फायदेशीर ठरत आहे. मात्र गेले अनेक महिन्यांपासून ही बस सेवा अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे फार मोठे हाल व नुकसान होत आहे. या मार्गावर आधीच एसटीच्या बस फेऱ्या कमी आहेत, त्यातच असलेल्या फेऱ्या अचानक बंद केल्याने तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे फार मोठी गैरसोय होत आहे.
आता आंबा काजू पिकाचा हंगाम असल्याने शेतकरी आपल्या बागेतील आंबा काजू कोकम शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी नेत असतात. त्यातून आर्थिक फायदा शेतकऱ्याला होत असतो. मात्र एसटी अभावी त्याचे नुकसान होत आहे. अचानक एसटी बंद केल्यामुळे त्याला अव्वाच्यासव्वा भाडे भरून घरी जावे लागत आहे. त्यामुळे चार आण्याची कोंबडी, आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. त्याचप्रमाणे आता मे महिना असल्याने शाळेला सुट्टी पडली आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी वर्ग कुटुंबासमवेत गावाकडे मोठ्या प्रमाणात आला आहे. मात्र मामाच्या गावाकडे जाणारी एसटी फेरी अचानक बंद होत असल्याने एसटी महामंडळाच्या या गलथान व मनमानी कारभारबाबत प्रवाशांमध्ये असंतोष व नाराजी पसरली आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.