loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचकीस्वाराचा जागीच मृत्यू

संगलट खेड (इक्बाल जमादार) - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री 8 ते 9 दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात वाहनाचा शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे. लोहारे पवारवाडी येथील शेतकरी बाबूराव भोसले हे त्यांच्या मोटारसायकलवरून शेताला पाणी सोडण्यासाठी जात असताना महानगर सीएनजी गॅस पंपानजिक एका अज्ञात वाहनाची त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक बसून ते जागीच गतप्राण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघाताची माहिती प्राप्त होताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच तातडीने मृतदेह पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहामध्ये पाठविण्यात आला. या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांतील फूटेज तपासून तातडीने अज्ञात वाहनाच्या शोधकार्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg