loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरात वस्तीलगत वनविभागकडून फेन्सींग, सभापती प्रतिक बांदेकर यांचा पाठपुरावा

सावंतवाडी : शहरात जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या संवेदनशील भागात तातडीने बारबेड वायरचे (काटेरी कुंपण) घालण्यात यावे, अशी मागणी न.प.सभापती प्रतिक बांदेकर यांनी वनविभागाचे उप वनसंरक्षक यांच्याकडे केली होती.‌ त्यांच्या मागणीला यश आले असून फेन्सींग करण्यात आल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील सालईवाडा, माठेवाडा, शिरोडा नाका आणि जुना बाजार हे भाग वनक्षेत्राला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून या नागरी वस्त्यांमध्ये गवा रेडे, सांबर आणि रानडुक्कर, बिबट्या यांसारखे हिंस्र वन्यप्राणी शिरकाव करत होते. यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते. यानंतर स्थानिक नगरसेवक बांदेकर यांनी उप वनसंरक्षक कार्यालयाला पत्र देत वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील प्रवेश रोखण्यासाठी कुंपण बांधण्याची मागणी केली.

टाइम्स स्पेशल

यानंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने वन विभागाने फेन्सिंग केले. शहरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन सालईवाडा व अन्य भागांत कुंपण घातल्याने सभापती बांदेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg