loader
Breaking News
Breaking News
Foto

१० मे रोजी साईधाम बिजघर येथे साई मंदिराचा ३० वा वर्धापन दिन सोहळा

खेड (प्रतिनिधी) - साईबाबा मंदिर साईधाम बिजघर तालुका खेड येथे ३० वा वर्धापनदिन रविवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याचे मंदिराचे प्रवर्तक सदानंदराव भोसले यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. या वेळी मंदिरात सकाळी 5 वाजता काकड आरती, सायंकाळी 5 वाजता सत्यनारायणाची महापूजा तर 7 वाजता मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री 9 वाजता साई भंडारा तसेच रात्री बिजघर ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन होणार असल्याचे मंदिराचे प्रवर्तक व मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले. तरी सर्व साईभक्त, बीजघर ग्रामस्थ व खेड तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळीसह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg