loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनियुक्त जिल्हा वन्यजीव रक्षकांच्या भव्य सत्काराचे आयोजन

सावंतवाडी : जिल्ह्यातील पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत, शासनातर्फे नवनियुक्त जिल्हा वन्यजीव रक्षक यांचा भव्य सत्कार समारंभ आणि विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वा. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनातर्फे पुढील तीन वर्षांकरिता 'जिल्हा वन्यजीव रक्षक' म्हणून निवड झालेल्या दोन नामवंत तज्ज्ञांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तिलारी (दोडामार्ग) येथील वन्यजीव तज्ज्ञ संजय सावंत आणि रानबांबूळी येथील पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. सत्कार समारंभानंतर "जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन" या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या सत्रात जिल्ह्यातील पर्यावरणापुढील आव्हाने आणि संवर्धनाच्या संधी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg