पनवेल :- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रातील विविध मतदारसंघांमधील मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर रणनीती आखण्यात आली.
या बैठकीत महापालिका हद्दीत गेल्या काही काळात वितरित करण्यात आलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. या बैठकीला सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक परेश ठाकूर, रवींद्र भगत, सुमित झुंझारराव, अजय बहिरा, शशिकांत शेळके, प्रीती जॉर्ज, अस्मिता घरत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटये, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या दोषमुक्त करणे आणि अवैध नोंदी रोखणे यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.