संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड तटकरे सभागृह येथे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात पार पडले व शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुधीर सोनावणे, अजय बिरवटकर जिल्हा परिषद सदस्य, संग्राम कदम , तसेच खेडच्या नगराध्यक्ष माधुरी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश शिकणे, स्वप्निल शेतावडेकर, यश खेडेकर, प्रेमळ चिखले, आरिफ मुल्लाजी, तोसिफ खोत, दिवाकर प्रभू मंडल अधिकारी उमेश भोसले ग्राम महसूल अधिकारी आरती रसाळ यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते बिरवटकर यांनी बोलताना सांगितले की तहसीलदार सोनवणे व सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी चे कौतुक केले. या शिबिराचे उत्कृष्ट असे नियोजन होते कारण एकाच छताखाली सर्व दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना डोमेसाईल जातीचे दाखले, उत्पन्न असे दाखले तसेच सातबारा आधी दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी खेड नगरीच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच पप्पू चिकणे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यावेळी तहसीलदारांनी सांगितले की खेड तालुक्यात ठीक ठिकाणी असा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेताना पाहून आम्हालाही आनंद होत आहे. भविष्यात अशी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा, अशी विनंती त्यांनी लाभार्थ्याने केली. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल अधिकारी उमेश भोसले, हिरालाल माळी, नादगाव सज्जा च्या तलाठी आरती रसाळ माळी, हितेश वनजू, अनिल जंगम, अरविंद खेडेकर, गौरी लाले आदी मेहनत घेतली.. कार्यकमाचे सूत्रसंचलन मंदार आपटे यांनी केले.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.