loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कुल कट्टाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९६. ८८ टक्के

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९६. ८८ टक्के एवढा लागला. या परीक्षेत प्रशालेमधून स्वराली विनय ताम्हणकर ही ४८४ गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. या परीक्षेसाठी प्रशालेतून ६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेमधून मयुरीका अमित मांजरेकर ही ४८२ गुण मिळवीत द्वितीय तर हर्षल प्रकाश कानूरकर ४५९ गुण मिळवून तृतीय आला. तसेच हर्षिता प्रकाश कानूरकर ४५८ गुण मिळवून चतुर्थ आणि रुद्राक्ष दिलीप मेस्त्री ४३७ गुण मिळवून पाचवा आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. भाट, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg