loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी: जिजाऊ मोफत वाचनालयाच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिसात निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये सावंतवाडी येथील 'जिजाऊ मोफत वाचनालया'च्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र पोलीस दलात बाजी मारली आहे. ​यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय अंकुश मोर्ये (रा. मोरे, ता. कुडाळ), तुकाराम सुभाष आईर (रा. वाफोली, ता. सावंतवाडी) आणि विष्णु राधाकृष्ण केरकर (रा. मळगाव, ता. सावंतवाडी) यांचा समावेश आहे. हे तिन्ही विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस म्हणून रुजू होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या २० वर्षांपासून समाजसेवक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यांत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत प्रभावी काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत कोकणात तब्बल ५५ सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी मोफत वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. ​यापैकीच एका असलेल्या सावंतवाडी, माठेवाडा येथील वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी सर्व पुस्तके उपलब्ध असून, ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत या वाचनालयाच्या माध्यमातून वीसहून अधिक युवक विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासनाच्या सेवेत दाखल झाले आहेत. ​या यशाबद्दल तिन्ही विद्यार्थ्यांचे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आणि वाचनालयाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना या मोफत वाचनालयाचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg