loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर; युवासेनेकडून अभिनंदन

रत्नागिरी - पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि विशेष कामगिरीची दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना मानाचे पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा आणि पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. विवेक पाटील यांच्या या सन्मानाचे औचित्य साधून युवासेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख संदेश नारगुडे आणि उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी विवेक पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. विवेक पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या विज्ञानाधारित तपास आणि विशेष मोहिमांमधील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत म्हणाले की, "विवेक पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg