loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरात विकासकामांचा धडाका, नगराध्यक्षा श्रद्धाराजेंच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते विविध भागांतील सहा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. प्रामुख्याने सांडपाणी निचरा आणि गटार व्यवस्थापनावर भर देत ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खासकीलवाडा येथील गवस पाणंद येथील पाटणकर घराच्या बाजूने असलेल्या नाल्याचे संरक्षक बांधकाम करणे तसेच नाडकर्णी हॉलपासून पुढील गटार प्रणाली बंदिस्त करणे, गजानन सुभेदार यांच्या घरापासून निर्गुण यांच्या घरापर्यंतच्या गटाराची दुरुस्ती, तसेच महादेव भाटले, सतिश सावंत ते अशोक सावंत यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधकाम करणे. दत्त रेसिडेन्सी गृहनिर्माण संस्थेजवळील शासकीय जागेतील गटार बंदिस्त करून त्यावर लादीकरण (पेव्हिंग) करणे तसेच पारसेकर घर ते पटेकर घर या दरम्यान नवीन गटार बांधणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक संजू परब, नगरसेविका स्नेहा नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक यांच्यासह पालिकेचे अभियंता, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg