loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे चाफवलीला परिसराला पावसाने पुन्हा झोडपले, आंबा काजूचे मोठे नुकसान

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला ढगांच्या गडगडाटासह पाऊस-वार्‍याने पुन्हा झोडपले. यामुळे आंबा काजूचे फार मोठे नुकसान झाले आहे. बर्‍याच ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. पाऊस अचानक आल्याने शेतकर्‍यांची फार मोठी धांदल उडाली. देवळे चाफवली परिसरातील शेतकर्‍यांनी काल पडलेल्या पावसाच्या भीतीने आंबा काढण्याची लगबग करायला सुरुवात केली होती. परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धांदल उडाली. या परिसरात मे महिन्याच्या दरम्यान आंबा-काजू पिक जोरदार येते. त्यामुळे आंबा काजूचे वादळी वार्‍यामुळे उरले सुरले पिकाचेही फार मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवारी पडलेल्या पावसाच्या तुलनेने काल पडलेला पावसाचे प्रमाण फार मोठे असल्याने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला आंबा वार्‍याने पडला तर उरलेला झाडावर असलेला आंबा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लग्नसराईच्या हंगामात या अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांचा हिरमोड देखील झाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg