खेड - न्यू इंग्लिश स्कुल तुंबाड, ता. खेड या माध्यमिक शाळेचा फेब्रुवारी/मार्च २०२६ चा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १००% लागला असून प्रशालेत प्रविष्ठ झालेल्या २४ पैकी २४ उत्तीर्ण झाले असून विशेष प्रविण्यासह ०३ विद्यार्थी, ०७ प्रथम श्रेणीत, १४ द्वितीय श्रेणित यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, सर्व तुंबाड पंचक्रोशी मधील लोकप्रतिनिधी व सर्व समित्यांचे पदाधिकारी, साई सावली शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम, उपाध्यक्ष सिद्धेशदादा कदम, उपाध्यक्ष अरुण उर्फ अण्णा कदम, संस्था सचिव तथा गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, खजिनदार योगिता कापडी कदम, सीईओ मेजर काशीराम सकपाळ, शैलेश कदम, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रशांत खेडेकर यांनी अभिनंदन केले आहे.
यामध्ये पहिला क्रमांक मिळविलेला विद्यार्थी अभिजित खंडेराव पावरा यास ४५० गुण मिळवित ९०.००%सह यश संपादन केले. दुसरा क्रमांक विद्यार्थी रोहन भरत रेमजे यास ३८९ गुणांसह ७७.८०% टक्के तर तृतीय क्रमांक विद्यार्थीनी पूर्वा हेमंत भागणे हिस ३७६ गुणांसह ७५.२०% टक्के गुण मिळवून यश संपादन केले. प्रशालेत चौथा क्रमांक विद्यार्थी वेदांत रविंद्र डेरवणकर याने मिळविला त्यास ३६७ गुणांसह ७३.४०% टक्के मार्क्स मिळाले. पाचव्या क्रमांकासाठी विद्यार्थी मानसी महादेव भागणे हिने ३६२ गुण मिळवत ७१.२०% टक्के गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांवर सर्व शिक्षकवर्ग, पालकवर्ग व परिसरातील नागरिकांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.