ठाणे (प्रतिनिधी) : बेळगाव येथून चोरी करून आणण्यात आलेली किया कंपनीची सेल्टोस कार कापूरबावडी वाहतूक विभागाला जप्त करण्यात यश आले आहे. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. वाहतूक विभागाच्या धाडसी आणि समयसूचकतापणाने अनर्थ टळला वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १० मे २०२६) गोल्डन क्रॉस परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कापूरबावडी वाहतूक विभागाला संदेश प्राप्त झाला. नवी मुंबई हद्दीतून चोरीची KIA Seltos (KA 22 MC 8122) ठाणे शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती देण्यात आली होती.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अश्रू हाके, PSI सागर सांगवे आणि सहकाऱ्यांनी गोल्डन क्रॉस येथे संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालून भरधाव वेगाने घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची पल्सर दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला. घोडबंदर दिशेने तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी स्वतः पाठलाग केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. आरोपी वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता तसेच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता.
अखेर विजय गार्डन सिग्नलजवळ पोलिसांनी कार अडवण्यात यश मिळवले. मात्र चालक कार सोडून पळून गेला. त्यानंतरही पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी आरोपीचा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत धावत पाठलाग केला. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा शर्ट पोलिसांच्या हातात आला, मात्र आरोपीने आडोशाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, जप्त करण्यात आलेली चोरीची कार कापूरबावडी वाहतूक विभागात आणण्यात आली. त्यानंतर कारचे मालक राहुल जाधव तसेच बेळगाव पोलिसांनी ठाण्यात येऊन कारची ओळख पटवली असून पुढील कारवाईसाठी वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.