loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी विकास सहकारी लांजा पतसंस्थेच्या मंडणगड शाखेत विश्वनाथ टक्के यांची सदस्यपदी निवड

दापोली (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील समाज बांधवाना कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजा या पतसंस्थेतील सुरक्षित गुंतवणूक आणि विविध कर्ज योजना व एकुणच विविध सेवांचा लाभ घेता यासाठी संस्थेचे सभासद वाढविणे, संस्थेच्या विविध ठेव योजनांचा लाभ सभासदांना मिळून देणे तसेच विविध कर्ज सुविधा सभासदांपर्यंत पोहोचविणे याकरिता संस्थेचा प्रचार व प्रसार करून संस्थेच्या विविध योजना आपल्या भागातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवाव्यात या प्रमुख उद्देशाने सामाजिक बांधिलकी व सहकार क्षेत्रातील अनुभवाचा विचार करता संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेच्या सहाय्यक स्थानिक कमिटी शाखा मंडणगड या कमिटीचे सदस्यपदी विश्वनाथ टक्के यांची एकमताने निवड केली आहे. गोर-गरीब समाजाची आर्थिक वेठबिगारीतून सोडवणूक करण्याच्या गरजेतून सन १९९६ मध्ये कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला संस्थेचे कार्यक्षेत्र लांजा तालुक्यापुरते मर्यादित होते. संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सन २०२०-२१ मध्ये संस्थेने संकल्प विकासाचा आणि विस्ताराचा" हा संकल्प करून संस्थेने रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी घेवून रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, राजापूर, दापोली, गुहागर, मंडणगड व खेड या तालुक्याच्या ठिकाणी शाखा सुरु केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व शाखांना उत्तम प्रतिसाद लाभला आहे. संस्थेचे संचालक मंडळ अतिशय सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जोपासत पतसंस्था गेली २९ वर्ष कामकाज करीत आहे. याचा लाभ निश्चितपणे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना होत आहे. मंडणगड तालुक्यातील समाज बांधवाना कुणबी विकास पतसंस्थेचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा याकरिता संस्थेचे सभासद वाढविणे, संस्थेच्या विविध ठेव योजनांचा लाभ सभासदांना देणे तसेच विविध कर्ज सुविधा सभासदांपर्यंत पोहोचविणे याकरिता संस्थेचा प्रचार व प्रसार करून संस्थेच्या विविध योजना आपल्या भागातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावी या हेतूने संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी संस्थेच्या सभासदांमधून प्रत्येकी चार सदस्यांची सहाय्यक स्थानिक कमिटी स्थापन करावी असे संचालक मंडळाने ठरविले आहे. त्यानुसार सामाजिक बांधिलकी व आपल्या क्षेत्रातील अनुभव या बाबींचा विचार करता संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेच्या सहाय्यक स्थानिक कमिटी शाखा मंडणगड या कमिटीचे सदस्य पदी विश्वनाथ टक्के यांची एकमताने निवड केली आहे.

टाइम्स स्पेशल

विश्वनाथ टक्के यांचे राजकीय, सामाजिक काम आणि तालुक्यातील दांडगा जनसंपर्क, सहकार क्षेत्रातील उत्तम जाण हा पतसंस्थेच्या एकुणच उत्कर्ष आणि प्रगती साठी पुरक ठरेल याचा सर्वांनाच विश्वास आहे. विश्वनाथ टक्के यांच्या निवडीचे पतसंस्था अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डफळे त्याचप्रमाणे मंडणगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गोवले तालुक्यातील कुणबी समाज बांधवांनी तसेच व्यापारी बांधवांनी यशस्वी निवडीचे स्वागत केले असून विश्वनाथ टक्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg