loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिला अंक सुरू झाला आहे, अजून दोन बाकी आहेत,” आमदार प्रमोद जठारांचे वादग्रस्त वक्तव्य

रत्नागिरीच्या राजकारणात भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “मी इतका सौम्य आहे की ज्यांच्या विरोधात लढलो त्या राणे साहेबांनाच भाजपमध्ये आणले. त्यामुळे रत्नागिरीतही तो प्रयोग करणार नाही असे नाही. तीन वर्षांनी पहा… पहिला अंक सुरू झाला आहे, अजून दोन बाकी आहेत,” असे जठार यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर रत्नागिरीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नेमका कोणता “प्रयोग” होणार? कोणता मोठा नेता भाजपच्या वाटेवर आहे? आणि “तीन अंक” म्हणजे नेमके काय? याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नारायण राणे यांचा उल्लेख करत जठार यांनी थेट मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. रत्नागिरीतील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर रत्नागिरीत आलेल्या जठार यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काळात रत्नागिरीत मोठे पक्षांतर, नव्या आघाड्या किंवा धक्कादायक राजकीय निर्णय पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg