loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात घरावर वीज कोसळली; टीव्ही, फ्रीजसह लाखोंचे नुकसान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शनिवारी 9 मे रोजी सांयकाळी विजांच्या कडकडाटासह लांजा येथील प्रभाकर शांताराम गुंडये यांच्या घरावर विज कोसळुन घरातील टीव्ही, फ्रीज, इन्व्हर्टर, तसेच इलेक्ट्रीक मीटर जळुन खाक झाले. यामध्ये त्याचे सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. शनिवारी वादळी वा-यासह विजांचा कडकडाट करत जोरदार पाऊस पडला. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या विज महावितरण कंपनीला चांगलाच फटका बसला. यावेळी लांजा आगरवाडीतील प्रभाकर शांताराम गुंडये यांच्या घरावर विजांचा जोरदार आवाज होत विज घरावर कोसळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्याच्या घरातील इलेक्ट्रीक साहीत्य जळुन गेले असुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. घटनेची माहीती मिळताच तलाठी, नगरसेवक तसेच नगपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व पंचनामा करण्यात आला. नुगसानग्रस्त गुंडये यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. 1997 सालीही अशाच प्रकारे प्रभाकर गुंडये यांच्या घरावर विज पडून नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg