loader
Breaking News
Breaking News
Foto

नरसापूर प्रकरणातील आरोपीवर जलदगतीने कारवाई करा, शिवसेना नगरसेव‍िकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

ठाणे (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापौर शर्मिला पिंपळोलकर व शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. संतप्त महिलांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही,” असे स्पष्ट मत मांडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आंदोलनादरम्यान केली. तसे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आंदोलकांनी आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारुन त्याचे दहन केले. ज्याप्रमाणे बदलापूर येथील प्रकरणात पीडीत कुटुंबाला न्याय मिळाला, त्याचप्रमाणे नरसापूर प्रकरणातील पीडीतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी संपूर्ण जनतेची मागणी असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी तसेच महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका व्यक्त केली. जर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनास शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख वंदना डोंगरे, विभागप्रमुख पुजा लोंढे, पुजा वाघ तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg