वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ मोठी बौद्धवाडी ता. गुहागर येथे सहकारी संघ शाखा क्र. ३५ भीम प्रेरणा युवा सेवा संघ सुरळ गाव मुंबई शाखा, आम्रपाली महिला मंडळ, सुरळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१५ मे २६ रोजी दुपारी ३ वा. गौतम बुद्ध मूर्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तीची भव्य मिरवणूक, १६ मे रोजी बुद्ध विहार उद्घाटन आदरणीय पूज्य भिककू विमल बोधी यांच्या हस्ते सकाळी १० वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप शांताराम मोहिते आहेत.सकाळी १०.१५ वा.बुद्ध मूर्ती स्थापना १०.३० ते ११.३० वा. ध्वजारोहण, बुद्ध पूजा पाठ, स्वागत समारंभ धम्मादेसना प्रवचन, संध्याकाळी मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्री १० वा. "मुक्तिदाता" करमणुकीचा कार्यक्रम होणार आहेत.
जानवळे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर सन १९८४ साली बांधण्यात आले. त्या वेळी मंडळाचे व्यवस्थापन वैकुंठवासी ह.भ.प. कृष्णा बुवा जांभळे, वैकुंठवासी ह.भ.प. केशव बुवा दळवी, वैकुंठवासी ह.भ.प. रामचंद्र बुवा दळवी व इतर सहकारी यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर बांधले गेले. या मंदिराचा जीर्णोद्धार वैकुंठवासी गुरुवर्य ह.भ.प. आत्माराम महाराज सोलकर, चिखली यांनी केला. गेली अनेक वर्षांची परंपरा या मंदिरात आहे अनेक पारमार्थिक कार्यक्रम नेहमी चालू असतात. होळी पोर्णिमा ते सप्तमी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. गावातील ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने सर्व कार्यक्रमात सहभागी होतात व सहकार्य करतात. तरी मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी मिळून भरभरून सहकार्य करावे व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे, आवाहन श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ जानवळे वार्ड क्रमांक २ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.