loader
Breaking News
Breaking News
Foto

मासू येथे रस्त्याचा उदघाटन सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - जिल्हापरिषद जनसुविधा योजनेतर्गत गुहागर तालुक्यातील मासू बुद्रुक येथील घाणातले टेप ते भाटलवाडी या रस्त्याचे उदघाटन दिनांक 10/5/2026 रोजी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या शुभहस्ते मोठया उत्सहात पार पडले. सदरच्या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. उपसभापती निलेश सुर्वे यांनी श्री. गणेश नृत्य कलापथक भाटलवाडी यांना संबोधित करताना आता झालेल्या नवीन रस्त्याला लवकरात लवकर डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाडीचे प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम यांनी रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे विशेष कौतुक केले व मासू गावासाठी यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कामे होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. उदघाटन सोहळ्यासाठी पंचायत समिती सदस्या स्नेहा शिगवण, भाजपा सरचिटणीस सचिन ओक, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विजय मसुरकर, शेखर आलीम, महादेव आलीम, उपसरपंच उज्वला नाचरे, सदस्या शर्मिला आलीम, गणेश नृत्य कला पथक भाटलवाडी अध्यक्ष गंगाराम आलीम, मुंबई अध्यक्ष महेश आलीम, वाडी प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम, शैलेश आलीम, अंकुश बारस्कर, प्रमोद आलीम आदी. महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg