loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे कारावास

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला खेड येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा सत्र न्यायालय क्र. १ ने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आनंद प्रकाश वाढवे (२३, मूळ रा. बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड, सध्या रा. पटवर्धन लोटे, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १८ मे २०२२ रोजी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये त्या चार दिवसांसाठी कामानिमित्त गोवा येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ. पी. एस. चांदगुडे यांनी भारतीय दंड विधान कलम ३७६ २) (जे) (एन), ३७६ (३), ५०६ तसेच लोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने ७ मे २०२६ रोजी दिलेल्या निकालात आरोपीस पोक्सो कलम ४ आणि भादंवि कलम ३७६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पोक्सो कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, पोक्सो कलम १२ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

टाईम्स स्पेशल

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील नलावडे ऍड ॲड. मृणाल जाडकर यांनी युक्तिवाद केला. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले होते. महिला पोलिस हवालदार अस्मिता साळवी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg