संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती मन्सूर नाडकर यांच्या मुलगा मेहरान याने कराड येथे एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याने त्यांचा नुकताच महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व सौभाग्यवती ज्योती रामदास कदम यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी रामदासभाई कदम यांनी मन्सूर नारकर यांचे तोंड भरून कौतुक केले. मन्सूर नाडकर यांचा शिक्षणाशी पूर्वीपासून लगाव असल्याने स्वतः ते एक अभियंता आहे. त्यांची मोठी मुलगी मुस्कान वैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्वल नाव करून लोकांची सेवा करीत आहे.
नाडकर यांचा मुलगा मेहरान यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटला असल्याने रामदासभाई कदम यांनी मन्सूर नाडकर यांच्या परिवाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. शिक्षणाचा प्रवाह कसा घ्यावा हा माजी उपसभापती मन्सूर नारकर यांच्याकडून घेण्यासारखे एक आदर्श आहे. त्यांच्या लहान मुलांनी नुकतेच दहावी पास केले आहे. तोही वैद्यकीय क्षेत्रामध्ये वळणार असल्याचेही दिसून येत आहे. यावेळी रामदासभाई कदम यांनी डॉक्टर मेहरान याला शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष त्याचे अभिनंदन केले.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.