मालवण (प्रतिनिधी) - आचरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून घरांचे व दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काझीवाडी येथील इमारतीवरील मोबाईल टॉवर कोसळल्याने बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे.
गेले दोन दिवस आचरा परिसरात जोरदार वारे वाहून ढगाळ स्थिती निर्माण होत असतानाच आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या पावसाने आचरे गावात हाहाकार उडविला. आचरा देवूळवाडी येथील मनिषा मनोहर आयर यांच्या घरावर आंब्याची मोठी डहाळी मोडून पडल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घरातील मंडळी सुदैवाने बचावली. आचरा वरचीवाडी येथील विशाल वसंत कांबळे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी पत्र्याचे छप्पर पुर्णतः उखडून गेले. यामुळे कांबळे तसेच वरच्या भागात राहणारे भाडोत्री गणेश सहदेव जाधव यांच्या घरातील जिवनावश्यक वस्तू, सामान भिजून मोठे नुकसान झाले आहे. आचरा वरचीवाडी येथील प्रकाश गुरव यांच्या दुकान गाळ्यासमोरील गुलमोहराचे झाड दुकान गाळ्यांवर पडून नुकसान झाले. आचरा काझी वाडी येथील वाचनालयाच्या तीन मजली इमारतीवर उभा केलेला बीएसएनएलचा टॉवर पुर्णतः उन्मळून खाली कोसळून पडला होता. सुदैवाने इमारती लगत असलेली नाशिर काझी,अब्दुल रहमान काझी यांची घरे सुदैवाने वाचली. टॉवरचे कोसळल्याने आचरामधील काही भागातील बीएसएनएल नेटवर्क गायब झाले आहे.
आचरा बंदर रोडवर राॅजर फर्नांडीस यांच्या परसातील माड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अन्थोनी फर्नांडीस यांच्या दुकानाच्या गाळ्यावर मोडून पडल्याने आचरा बंदर रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. या दुकान गाळ्यात आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांचे आयस्क्रिम पार्लर असून माड पडल्याने त्या दुकानातच अडकून पडल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी आणि सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी तातडीने हालचाल करत जेसीबीच्या सहाय्याने मोडून पडलेले माडाचे झाड हटवून रस्ता मोकळा केला. वरचीवाडी येथील यलाप्पा गुरव यांच्या परसातील माडाचे झाड मोडून पडल्याने लगतच्या विनोद गवळी यांच्या आवारात उभी केलेल्या भाई गावकर यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. हिर्लेवाडी, भंडारवाडी येथेही आंब्याची झाडे पडून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. वारा आणि पावसाचा फटका विद्यूत मंडळालाही बसला असून अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने आचरे गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी विद्युत मंडळ कर्मचारी धरणे, मंगेश परब यांसह अन्य कर्मचारी आदी झटत होते. गावातील नुकसानीची सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी पाहणी करत नुकसानग्रस्ताना धीर दिला.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.