खेड : तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव ११ ते १३ मे याकालावधीत विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडणार आहे. ११ मे रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार आहे. शिवतेज आरोग्य सेवा संस्थाध्यक्षा ज्योती कदम, योगिता कदम-कापडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्या कार्यक्रमात पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात किशोर सावंत सूत्रसंचालन करणार आहेत.
१२ मे रोजी सकाळी ९ वाजता नवचंडी यज्ञ, दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सौजन्याने रात्री ९ वाजता ’फोक लोक’ हा कार्यक्रम होईल. १३ मे रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद व भंडारा, सायंकाळी ४ वाजता देवीची पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता सत्कार, रात्री ९ वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या सहकार्याने ’ऑल दि बेस्ट’ हे मराठी नाटक सादर होईल.
याप्रसंगी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, जि.प.सदस्य अरूण कदम, स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत कदम, कर्नल अनिल कदम, मेजर अभय कदम, उद्योजक सदानंद कदम, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम, विजय कदम, शशिकांत कदम, जामगे ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुरेश कदम आदी उपस्थित राहाणार आहेत.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.