सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी जिमखाना मैदानावर तालुका क्रीडांगण विकसित होत आहे ती पाहणी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहाणी केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेंसह क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभं करणारं असल्याचा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभ करत इन डोअरसह आऊट डोअर क्रीडा प्रकारही इथे उपलब्ध असणार आहेत. मुलांमध्ये क्रीडा प्रकारांची आवड निर्माण होण्यासाठी न.प. च्या सहकार्यातून प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी क्रीडा अधिकाऱ्यांकडून केसरकर यांनी कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा इंगवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, न.प. चे सार्वजनिक बांधकाम अभियंता तुषार सरडे, उप अभियंता सीमा गोवेकर, अर्चित पोकळे, प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.