loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधानांचे आवाहन पाळा, बैलगाड्यांनी प्रवास करा; राष्ट्रवादी (श.प.) ने चालविले रस्त्यावर बैलगाड्या आणि टांगे

ठाणे (प्रतिनिधी) - पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, असे आवाहन केले आहे. एकीकडे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे पंतप्रधान जनतेला धडे देत आहेत. त्यांच्या या आवाहनाची अंमलबजावणी सर्वात आधी महापौर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपलोळकर यांना निवेदन देऊन, खासगी गाड्यांचा वापर न करता टीएमटीच्या बसगाड्यांची वापर करावा, असे आवाहन केले. दोन दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी चलन वाचविण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. हे चलन वाचविण्यासाठी त्यांनी काही उपाय सूचविले आहेत. अर्थात, हे उपाय म्हणजे "भीक नको, कुत्रं आवर" अशा पद्धतीचे आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने गणेशवाडी ते ठाणे महानगर पालिका मुख्यालय अशी रॅली काढली. या रॅलीत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावर बसून महानगर पालिकेपर्यंत प्रवास केला. तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी बैलगाडीतून पालिका मुख्यालय गाठले. या रॅलीमध्ये घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, वाह रे मोदी तेरा खेल ... महंगा हुआ तेल; मोदी फिरतात परदेशी.... जनता राहणार उपाशी; मोदी घालतात कोटींचा कोट, जनतेचे गेले खपाटीला पोट; चेल्या चपाट्याना कोट्यवधींचे कंत्राट, देशाची अर्थव्यवस्था झाली सपाट, अशा घोषणा देण्यात आल्या. ठाणे महानगर पालिकेसमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बंगालच्या निवडणुका संपल्या आहेत. आता पेट्रोल तीस रुपयांनी महाग करायला हे सरकार मागे पुढे पाहणार नाहीत. येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे घोडा, बैल म्हैस स्वस्त करून सरकारने ते विकावेत, अन् जनतेने त्यावर बसून जय मोदी, जय मोदी करीत प्रवास करावा का?देशाची अर्थव्यवस्था प्रचंड ढासळली आहे. अचानक रात्री आठ वाजता मोदी भारतीयांना सोने खरेदी करू नका, असे सांगत आहेत. सोनं कोण खरेदी करतं, मध्यमवर्गीय लोकच ना? अडीनडीला सोनं उपयोगी पडावी, अशी भावना त्या मागे असते. सोने खरेदी थांबली तर त्यावर गुजराण करणारे लाखो लोक बेरोजगार होतील, याचेही भान या सरकारला नाही. तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही, मंत्र्यांच्या 60-60 गाड्या फिरत आहेत. पार तमाशा केला आहे देशाचा ! यापुढे महागाई अधिकाधिक वाढणार आहे. चीन युद्धानंतर ज्या पद्धतीने फेकून दिलेली ज्वारी- बाजरी खावी लागली होती; तसेच धान्य ट्रम्प आपल्याला देणार आहे. वरून दमही देणार आहे. हे जर इराण - अमेरिका युद्धाने झाले आहे, असा दावा केला जात असेल तर कुणाची बाजू घ्यावी, हे समजायला नको का?संध्याकाळी आठ नंतर यायचे आणि घोषणा करायची; असे काय होते की आठ नंतरच नोटाबंदी, टाळ्या-थाळ्या आणि आता पेट्रोल घोषणा केल्या जात आहेत.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मनोज प्रधान यांनी, "दोन दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी चलन वाचविण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. हे चलन वाचविण्यासाठी त्यांनी काही उपाय सूचविले आहेत. या उपायांचा अवलंब सत्ताधारी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून भारतातील तेलसाठा संपुष्टात आला असल्याचे कारण स्पष्ट होत आहे. आजरोजी ठाणे महानगर पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी नियमितपणे खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. या वाहनांचा इंधन खर्च ठाणे महानगर पालिकेकडून केला जात आहे. म्हणजेच, एका शासकीय संस्थेकडूनच परदेशी चलनाची उधळण केली जात आहे. ही उधळपट्टी रोखण्यासाठी ठाणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी खासगी वाहनाऐवजी टीएमटीद्वारे संचालित इलेक्ट्रिक बससेवेचा वापर करावा; तसेच, इतर पदाधिकारी, आयुक्त तथा सर्व अधिकाऱ्यांना टीएमटीच्या इलेक्ट्रिक बससेवेचा वापर करण्यासाठी त्यांनी आदेश देऊन परदेशी चलन वाचविण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. तसेच, आमचे हे आवाहन जर संबधीतानी पाळले नाही तर हे सत्ताधारीच पंतप्रधानांच्या आवाहनाला जुमानत नसल्याचे स्पष्ट होणार आहे, असेही प्रधान म्हणाले. या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेता अभिजीत पवार, महिला अध्यक्ष नगरसेविका मनिषा भगत, नगरसेविका पल्लवी जगताप, दीपाली भगत, मर्जिया पठाण, महिला कार्याध्यक्षा फुलाबानो पटेल, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, आदी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg