loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहरातील जळगाव जवळील पेट्रोल पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा; रिक्षाचालक मेटाकुटीला

संगलट खेड (प्रतिनिधी) - दापोलीतील दाभोळ रस्त्यावरील जळगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून इंधन भरण्यासाठी रिक्षांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः सीएनजी (गॅस) आणि पेट्रोल भरण्यासाठी रिक्षाचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. दापोली-दाभोळ या मुख्य रस्त्यावर रांगा लागल्यामुळे इतर वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. रांगेत उभे राहिल्यामुळे रिक्षाचालकांचा कामाचा वेळ वाया जात असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होत आहे. सीएनजी गॅसचा पुरवठा कमी असल्याने किंवा पंपावर तांत्रिक बिघाड असल्यामुळे या रांगा वाढत असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. "आम्हाला दिवसातील ३-४ तास केवळ रांगेत घालवावे लागत आहेत, यामुळे प्रवासी वाहतूक करणे कठीण झाले आहे," अशी व्यथा स्थानिक रिक्षाचालकांनी मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी या रांगांची लांबी जळगाव गावाच्या वेशीपर्यंत पोहोचत आहे. दापोली शहरात इतर ठिकाणी सीएनजीची उपलब्धता मर्यादित असल्याने या एकाच पंपावर प्रचंड ताण येत आहे. रस्त्यावरील या रांगांमुळे अपघाताची भीती देखील व्यक्त केली जात असून, प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि रांगांचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg