loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच-लांब रांगा

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातील तसेच गिम्हवणे येथील काही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले होते तर काही पेट्रोल पंपावर इंधन विक्री सुरू होती. यामध्ये दापोली शहरातील श्वेता पेट्रोल पंप, मेहता पेट्रोल पंपावर तर गिम्हवणे येथील राजलक्ष्मी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली शहरात ४ तर दापोली शहरानजिकच्या गिम्हवणे गावात २ पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी शहरातील तहसीलदार कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियमच्या मेहता पेट्रोल पंपावर तसेच खोंडा येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या श्वेता पेट्रोल पंपावर तसेच जालगाव रोडवरील इंडियन ऑईल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनांची बुधवारी मोठी रांग लागली होती.

टाइम्स स्पेशल

दापोली खेड रोडवरील पेट्रोल पंप तसेच गिम्हवणे येथील पेट्रोल पंप वगळता दुसऱ्याही गिम्हवणेतील पेट्रोल पंपावर इंधन साठा संपल्याने तो बंद होता. त्यामुळे पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर वाढणार तसेच इंधनाचा तुटवडा भासणार असल्याच्या शक्यतेचे अफवांचे पिक पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी मोठीच गर्दी केली होती. आखाती देशातील युद्धामुळे इंधन तुटवडयाला सामोरे जावे लागणार या उद्देशाने अनेकांनी पेट्रोल पंपावर धाव घेत आपल्या ताब्यातील वाहनांच्या इंधन टाक्यांत इंधन भरून टाक्या फुल्ल करून घेतल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg