खेड : तालुक्यातील सुकिवली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १) घेण्यात आले. या शिबीराचे आयोजन गोपाळवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या आवारात करण्यात आले. या शिबिरास उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसिलदार सुधीर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. अफिया पालेकर, पंचायत समिती सदस्य सुनीता कासार, नायब तहसीलदार सुषमा धातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीराला सुमारे ७०० पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. या शिबीरामध्ये महसूल, भूमिअभिलेख, कृषी, आरोग्य आदी शासकीय विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाने जातीचे दाखले ३७, रहिवाशी दाखले १४०, उत्पन्न दाखले ७०, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ३, भोगवटादार वर्ग २ च्या ३७९ जमिनींचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरण करून उपस्थित शेतकऱ्यांना ७/१२ चे वाटप करण्यात आले. १२० शेतकऱ्यांना डिजीटल ७/१२ तर ५१ जणांना ८अ उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिरात २९ वारस नोंदी करण्यात आल्या.
आधार अपडेशन ३२०, रेशनकार्ड दुरुस्ती/नवीन रेशनकार्ड ११, भूमिलेख विभागाकडून ३३ प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. कृषी विभागातील महाविस्तार, अँग्रीस्टॅक, कृषी संजीवनी आदी योजनेअंतर्गत ५५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. आरोग्य विभागाने शिबिरात सुमारे ३६७ जणांची आरोग्य तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तळेच्या मंडळ अधिकारी अर्चना लाकडे, ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील (तळे), सागर माने (सुकीवली), रोहन पाटेकर (दहिवली), राजेश चव्हाण (जैतापूर) राजेश डुकरे (मांडवे), योगेश आपटे (देवघर) तसेच सर्व कोतवाल, पोलिस पाटील आदींनी परिश्रम घेतले.




































































































































































.jpg)




.jpg)























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.