loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंड असुर्डे येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोंड असुर्डे येथे गावातील महिलांनी पुढाकार घेत प्रथमच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील महिलांनी विविध थोर व प्रेरणादायी महिलांच्या वेशभूषा साकारून केले. हा उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमाला शिक्षिका मुळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा नारकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी राधा कृष्ण सेवा मंडळ, उमेद अभियान अंतर्गत सिद्धिविनायक महिला ग्रामसंघ कोंड असुर्डे व राधा कृष्ण महिला बचत गट यांचे विशेष सहकार्य लाभले. गावकऱ्यांनी महिलांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg