loader
Breaking News
Breaking News
Foto

'मातृत्व ते नेतृत्व' स्त्रीच्या प्रवासाचा तेजस्विनी सन्मान, आदर्श शैक्षणिक समूहाचा आगळावेगळा स्त्री शक्तीचा जागर

पनवेल :- जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करणारा अविस्मरणीय सोहळा आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल, आदर्श महिला मंडळ, पदवीधर प्रकोष्ठ भाजपा, महिला मोर्चा भाजपा पनवेल आणि सुवर्ण सखी महिला मंडळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मातृत्व ते नेतृत्व… स्त्रीच्या प्रवासाचा सन्मान” या विशेष कार्यक्रमात “तेजस्विनी सन्मान २०२६” अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्राप्त झालेल्या तब्बल २२४ नामांकनांमधून २१ विविध क्षेत्रांतील २२ तेजस्विनींची निवड करून त्यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक सन्मानित महिलेची यशोगाथा ही केवळ तिची वैयक्तिक कथा नसून हजारो महिलांसाठी प्रेरणेचा दीप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्राचे लाडके, अभ्यासू आणि लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक व सूत्रसंचालक “चला हवा येऊ द्या” फेम डॉ. निलेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर झालेला “वहिनीसाहेब सुपरस्टार” हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय क्षण ठरला. विधानपरिषद आमदार तथा भाजपा महिला मोर्चा, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थिताना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करत सर्वाना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी १२०० हून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला मोहिनीताई विक्रांत पाटील, प्रियाताई मुकादम (जिल्हाध्यक्ष, महिला मोर्चा, रायगड), चारुशिलाताई घरत (सरचिटणीस, महिला मोर्चा, रायगड), प्रमिलाताई पाटील (उपमहापौर, पनवेल महानगरपालिका), राजश्रीताई वावेकर (अध्यक्ष, महिला मोर्चा, पनवेल शहर) यांसह अनेक मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आयोजक आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन तथा पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते व आदर्श समूहाच्या संचालिका संगीता विसपुते यांच्या पुढाकारातून हा सोहळा अधिक भव्य, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी केलेल्या काव्यत्मक सुत्रसंचलनाने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली. “मातृत्व ते नेतृत्व” हा प्रवास म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या जिद्दीचा आणि समाज परिवर्तनातील तिच्या मोलाच्या योगदानाचा उत्सव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg