loader
Breaking News
Breaking News
Foto

गॅस सिलिंडरमुळे झाली दिशाभूल, अखेर पेटली दापोलीची चूल

संगलट खेड (इक्बाल जमादार) - वाढते दर असोत किंवा गॅस सिलिंडरची टंचाई, सामान्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच आता जुन्या परंपरांकडे वळावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. दापोली शहरातही आज असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला, जिथे एका हॉटेल व्यावसायिकाने गॅसची वाट न पाहता थेट चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीतील 'फॅमिली माळ' परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाने चक्क चुलीवरचे जेवण बनवण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हे हॉटेल ज्या ठिकाणी आहे, त्याच्या शेजारीच 'एचपी गॅस मेहंदळे' यांचे कार्यालय आहे. गॅस एजन्सीच्या अगदी बाजूला असूनही गॅस अभावी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हॉटेल मालकाला चुलीचा आधार घ्यावा लागल्याने नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे.​

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg