देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख येथे अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्यानंतर व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व खाद्य व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ९०% हॉटेल, चायनीज, वडापाव, मिसळ नाष्टा सेंटर, चहा विक्रेते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. फार गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याने या पार्श्वभूमीवर क्रांती व्यापारी संघटना, देवरुख यांच्या वतीने तहसीलदार यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि व्यथा त्यांच्या समोर मांडण्यात आल्या.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल, चायनीज सेंटर, नाष्टा सेंटर, वडापाव, मिसळ तसेच चहा विक्रेते यांचे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी व कामगारांवरही उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच प्रवासी, पर्यटक आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांना हॉटेल सेवांचा मोठा आधार असतो, त्यामुळे ही सेवा बंद राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणी निर्माण होत आहेत.
यावेळी तहसीलदार यांच्यासमोर व्यावसायिकांनी आपली व्यथा मांडत तातडीने पर्यायी मार्ग काढण्याची मागणी केली. यावर तहसीलदार यांनी या विषयाची दखल घेत “आपले म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून या प्रश्नावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू” असे आश्वासन दिले. दरम्यान, या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा देवरुख परिसरातील हॉटेल व खाद्य व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.