loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत १९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन; विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

सावंतवाडी (प्रतिनिधी) - गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीमध्ये १९ मार्च रोजी भव्य 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, यात शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता राजवाडा येथून सुरू होईल. यात्रेचा मार्ग नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान येथे संपणार आहे. हिंदू धर्माचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक शैलेश गुरुदास पै आणि सह-संयोजिका गायत्री गुरुदास देवस्थळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. या पत्रकार परिषदेत खजिनदार आनंद साधले, विकास रांगणेकर, विशाखा रांगणेकर, कस्तुरी देवस्थळी, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. या नववर्ष स्वागत यात्रेत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत असून, विविध संस्था आणि उत्सव समित्या यात सक्रिय सहभाग घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्यवाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांचा समावेश आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे संयोजक शैलेश पै व सह संयोजक गायत्री देवस्थळी यांनी आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg