loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये घरगुती गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) - पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅसवर कोणतेही निर्बंध नाहीत आणि गॅसचा तुटवडाही नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. सध्या व्यावसायिक गॅसवर काही निर्बंध लागू करण्यात आले असले तरी घरगुती गॅसच्या वापराबाबत कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तरीही काही टीव्ही वाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण आवश्यकता नसतानाही गॅस एजन्सींवर रांगा लावत आहेत. त्यामुळे अनावश्यक घबराट वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व स्थानिक प्रतिनिधींना त्यांच्या विभागातील गॅस वितरकांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका अस्मिता जगदीश घरत, तसेच युवा नेते अतुल घरत यांनी तातडीने गॅस वितरण एजन्सीला भेट देऊन आढावा घेतला. या सर्वांशी चर्चा केल्यानंतर घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अधिक सतर्कतेच्या दृष्टीने तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

घरगुती गॅस संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी आपल्या भागातील भाजप कार्यालय, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत निश्चितपणे केली जाईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिले. दरम्यान गॅस वितरण एजन्सीनेही घरगुती गॅस तुडवडा नसल्याचे स्पष्ट करून अफवांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg