कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 16 ही जागा शिवसेना-भाजपा महायुतीच्या ताब्यात असून सभापती उपसभापती निवड बिनविरोध होत आहे. कणकवली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड सोमवारी होत असून यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी हर्षदा वाळके तर उपसभापती पदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांनी अर्ज दाखल केला. सभापती व उपसभापती पदासाठी फक्त दोनच अर्ज दाखल झाले असल्याने सभापतीपदी हर्षदा वाळके तर उपसभापती कधी राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड होत आहे.
कणकवली पंचायत समिती ही पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या मतदारसंघांमध्ये येते. पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आहे. साहजिकच या पदासाठी अनेक दावेदार होते. मात्र यापूर्वी पंचायत समिती सदस्य सरपंच या पदांवर काम केलेल्या व आता नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या हर्षदा वाळके यांनाच सभापती पद भुषविण्याची संधी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तर यापूर्वी भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केलेल्या व आता वरवडे पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या राजेश उर्फ सोनू सावंत यांना उपसभापती पद भूषविण्याची संधी नितेश राणे यांनी दिली आहे. सोनू सावंत यांच्या पत्नी राधिका सावंत या देखील यापूर्वी वरवडे पंचायत समितीच्या सदस्या होत्या.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नाम निर्देशनपत्रे सादर करायचे होते. यावेळेस फक्त दोनच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी काम पाहिले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.