loader
Breaking News
Breaking News
Foto

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग

नवी दिल्ली: जागतिक वायू आणि तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर, इराणने एका भारतीय जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. इस्रायल आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने हा मार्ग रोखला होता आणि इशारा दिला होता की, येथून जाणाऱ्या कोणतेही जहाजाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणने भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत थायलंडमध्ये नोंदणीकृत मालवाहू जहाज, मयुरी नारी, एका अज्ञात क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. ज्यामुळे मोठी आग लागली. ओमानी नौदलाने बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत २० क्रू सदस्यांना वाचवले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तीन खलाशी अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg