loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे पोलिसांचे स्त्री शक्तीला ‘सुरक्षा कवच’

ठाणे (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट सुरक्षा उपक्रम राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यरत महिला तसेच रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता.१५ मार्च) सकाळी १० वाजता कापुरबावडी येथील सिनेवंडर मॉलमधील मंथन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांकरिता अस्थिरोग तज्ञांमार्फत मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जागरूकता वाढविण्याचा तसेच रस्ते अपघातांपासून संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. दरम्यान, यावेळी महिलावर्गाकरिता बोन डेन्सिटी या मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. असे वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg