loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीसाठी २० कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी जिल्ह्याचे 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार आता लवकरच एका अत्यंत देखण्या आणि कॉर्पोरेट थाटाच्या नवीन इमारतीतून सुरू होणार आहे. या भव्य सहा मजली इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले असून, तिच्या अंतर्गत सजावटीसाठी (इंटेरिअर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली असून, या निधीमुळे इमारतीच्या उर्वरित कामाला मोठा वेग मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन १९६२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषदेची जुनी इमारत आता जीर्ण झाली होती, त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस १०० कोटी रुपये खर्चून ही नवी अत्याधुनिक वास्तू उभारण्यात आली आहे. या इमारतीला आधुनिक लूक देण्यात आला असून, त्यामध्ये व्हीआयपींसाठी 'कॅप्सूल लिफ्ट' आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र दोन लिफ्टची सोय करण्यात आली आहे. इमारतीच्या दर्शनी भागावर सुंदर भित्तीचित्रे साकारली जाणार असून, संपूर्ण परिसर शोभिवंत झाडांनी सुशोभित केला जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

​मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केलेल्या या विशेष निधीमुळे आता अंतर्गत सजावटीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाईल. येत्या ३ ते ४ महिन्यात सर्व पदाधिकारी आणि अधिकारी या नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होतील. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आणि लाभार्थ्यांना एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सुविधा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg