loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी टर्मिनल व रेल्वे थांबे पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जलशक्ती मिशन' कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमान्ना यांना सावंतवाडी रेल्वे टर्मिनल आणि कोव्हिड काळातील रद्द केलेले रेल्वे थांबे पूर्ववत करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. माहिती अधिकार महासंघ व कोकण रेल्वे प्रवास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन हे साकडे घातले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते, जे अद्यापही पूर्ववत झालेले नाहीत. या दोन्ही प्रमुख मागण्यांसाठी माहिती अधिकार महासंघ, महाराष्ट्र राज्य (सिंधुदुर्ग संघटक) विनोद नाईक आणि कोकण रेल्वे प्रवास संघटना सावंतवाडी सचिव मिहिर मठकर, सागर तळवडेकर यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

संघटना मुंबई अध्यक्ष विनोद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. मंत्री महोदयांच्या वतीने त्यांचे सचिव अनिश हेगडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सावंतवाडी टर्मिनल व रेल्वे थांब्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. यामुळे सिंधुदुर्गवासीयांना आणि विशेषतः सावंतवाडीकरांना रेल्वे सुविधेबाबत लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg