loader
Breaking News
Breaking News
Foto

६० कोटींच्या कर्जासाठी शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, आंबा बागायतदारांची मागणी

रत्नागिरी : गेल्या काही काळापासून बदलत असलेल्या हवामानाचा मोठा फटका कोकणच्या राजाला म्हणजेच हापूस आंब्याला बसला आहे. यंदा केवळ २० टक्केच आंबा उत्पादन हाती येण्याचा अंदाज कृषी विद्यापीठाच्या अहवालातून समोर आला आहे. यामुळे आखाती देशांत होणाऱ्या ७० टक्के निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. बागायतदारांनी आता सरकारकडे आर्थिक मदतीचा हात मागितला आहे. सरकार या बाबत सकारात्मक असून बागायतदारांना दिलास देण्याच्यादृष्टीने निर्णय होईल, अशी अपेक्षा आंबा व्यावसायिक आणि रत्नागिरीतील आंबा बागायतदार संघटनेचे पदाधिकारी डॉ. विवेक भिडे आणि प्रकाश साळवी यांनी दिली. येथील जयश मंगल पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंबा बाबगायतदार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते म्हणाले, ​कोकण कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार, यंदा बागांमध्ये केवळ २० टक्केच आंबा शिल्लक आहे. वाशी मार्केटमध्ये एरवी होणारी ६ हजार पेट्यांची आवक आता केवळ १ हजार पेट्यांवर आली आहे. यामध्ये रत्नागिरीचा वाटा फक्त ४०० ते ५०० पेट्या इतकाच मर्यादित आहे. आंबा पिकासाठी बागायतदारांनी घेतलेले कर्ज साधारण ६० कोटींच्या घरात आहे. पीकच हाती नसल्याने हे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. सरकारने यामध्ये तातडीने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ​सध्याच्या पीक विमा योजनेत केवळ ५ एकरपर्यंतच्या बागांनाच भरपाई दिली जाते, जी अन्यायकारक आहे. "आम्हाला विश्वासात न घेता हे निकष ठरवले जातात," असा आरोप बागायतदारांनी केला आहे. त्यामुळे निकष लावताना आंबा बागायतदारांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.

टाईम्स स्पेशल

विमा परताव्यासाठी पाऊस हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे आता पुराव्यासाठी प्रत्येक गावात 'पर्जन्यमापक' यंत्र बसवण्यात येणार आहे, जेणेकरून विम्याच्या दाव्यांमध्ये पारदर्शकता राहील. ​हवामानामुळे आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीला आंबा पेटीला ६,००० रुपये इतका विक्रमी दर मिळत आहे. काल कोकणातून केवळ १००० पेट्यांची आवक झाली, तर संपूर्ण राज्यातून वाशी मार्केटमध्ये ५ हजार पेट्या पोहोचल्या आहेत. ​मोठे बागायतदार या व्यवसायापासून लांब का जात आहेत, यावरही चिंतन करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून बागायतदारांचे प्रश्न सोडवावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg