loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक महिला दिन निमित्त खेड शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खेडतर्फे शनिवार दिनांक - ७ मार्च -२०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खेड शहरातील विविध क्षेत्रांमध्ये स्वकर्तुत्वावर मोहोर उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. भाजपा नेते तथा माजी. नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील अश्या काही निवडक महिलांचा सन्मान करून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक करण्याच्या हेतून कार्यक्रम हाती घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन्मानार्थी पुढील प्रमाणे अस्मिता अशोक नायक, सुप्रिया शेखर भोसले, रूपाली मिलिंद बोडस, आरजू दाऊद अंतुले, दीपिका चंद्रकांत बनकर, या विविध क्षेत्रात कार्यरत असून.त्यांच्या निवासस्थानी जाऊन या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, राजेश जोयसर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राकेश चव्हाण, माजी नगराध्यक्षा पूनम ताई पाटणे- शेट्ये, आशा ताई सनगरे, मनाली मनोज पावसकर, माया गुहागरकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg