वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालशेत नाका येथे रेश्मा विजय पालशेतकर (राहणार अडूर) यांच्या दिपाली फुटवेअर चप्पल विक्रीच्या दुकानाला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट मुळे आग लागून दुकानातील चप्पल व इतर साहित्याचे अंदाजे ७० हजार ते ८० हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले असून सदर दीपाली फुटवेअर दुकान चालवणाऱ्या रेश्मा विजय पालशेतरकर या गरीब कुटुंबातील असून सदर महिलेचे झालेले आर्थिक नुकसान फार मोठे आहे.
बंद असलेल्या दुकानाला आतील बाजूने आग लागल्याचे गावातील नागरिक व व्यापाऱ्यांना दिसले. त्यांनी लगेच दुकानाचे कुलूप तोडून आग विझविण्याचे प्रयत्न केले. जर ग्रामस्थांनी आग विझविली नसती तर भीषण आगीचे तांडव निर्माण झाले असते. दुकानातील बहुतांश साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले. साधारणपणे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. तरी सदर महिलेला सर्वांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती सर्व स्तरातून होत आहे.
नुकसानग्रस्त ठिकाणी कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य अपूर्वा बारगोडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. नुकसान ग्रस्त महिलेला धीर दिला.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.